शेअर बाजार घसरला   

मुंबई : मुंबई शेअर बाजार शुक्रवारी घसरला. माहिती अणि तंत्रज्ञानाचे समभाग घसरले. तसेच आशियातील शेअर बाजारातील घसरणीचे परिणाम दिसले. अमेरिकेच्या न्यायालयाने वाढीव आयात शुल्क तात्पुरते लादण्यास मनाई केली आहे. या घडामोडीच्या आणि अनिश्चिततेच्या वाताावरणात शेअर बाजार खुला झाला. गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार पुढे येत नसल्याचे  ेचित्र भारतासह आशियातील बाजारपेठेत काल  दिसले.  दरम्यान, सेन्सेक्स १८२.०१ ने घसरून ८१ हजार ४५१ वर बंद झाला दिवसभरात तो एका क्षणीं ३४६.५७ ने घसरून ८१ हजार २८६ पर्यंत कमी झाला होता. निफ्टी ८२.९० ने घसरुन २४ हजार ७५० वर बंद झाला. 
 
टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, नेसले, सन फार्मा आणि टाटा स्टीलचे समभागंचे मूल्य घसरले. या उलट इटर्नल, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अँड ट्रुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बजाज फिनसिर्व्हच्या समभागांचे मूल्य वाढले. आशियातील दक्षिण कोरिया, जपान, शंघाय आणि हाँगकाँग बाजारात नकारात्मक वातावरण होते. युरोपीय बाजारात उलाढाल वाढली. गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार वाढला होता. अमेरिकेच्या प्रत्त्युत्तर कराबाबत न्यायालयाचा आदेश पाहता गुंतवणुकदार सावधगिरीने पावले टाकत असल्याचे चित्र दिसून आले.   

Related Articles